Utkarsh Shinde Post: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून आनंद शिंदे (Anand Shinde) यांना ओळखलं जातं. त्यांच्या आवाजाची जादू मराठी रसिकांवर कायम आहे. वेगवेगळी लोकगीते आणि मराठी चित्रपटांमध्ये सदाबहार गाणी त्यांनी गायली आहे. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबीयांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आनंद शिंदे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलांनी गायन क्षेत्रात सक्रिय आहेत. अशातच आनंद शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा धाकटा लेक म्हणजेच उत्कर्षने (Utkarsh Shinde) सोशल मीडियावर सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे उत्कर्ष शिंदेंने वडिलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतीच उत्कर्ष शिंदे यांने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर वडिलांबद्दल लिहिलंय की, "#हॅपी बर्थडे पप्पा.निसर्ग काही गोष्टी जगा वेगळ्या बनवतो त्यात एक उधारण म्हणजे तुमचा आवाज. ज्या वयात माणस रिटायरमेंट घेतात त्या वयात तुम्ही #bungafight सारखं गाणं देऊन तुम्ही एव्हरग्रीन आहात हे सिद्ध केलत.फॅन्स फॉलोवर्स सर्वांचे असतात पण तुमचे चाहते तुम्हाला आळवा वरच्या दवबिंदू सारखं झेलतात."
यानंतर पुढे त्याने लिहिलंय, "काल परवा तुमचा आवाज बसला आणि मी परफॉर्म केल माणसं नाचले धम्माल मजा केली, तुम्ही फक्त बसून होतात तरीही स्टेज भरून होता.तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. भारताला आनंदशिंदे अजून ऐकायचे आहेत.तुम्हाला माझ आयुष लागो..मजेत रहा आनंदी राहा." अशा आशयाची पोस्ट उत्कर्षने लिहिली आहे. दरम्यान, उत्कर्षने या पोस्टद्वारे वडिलांप्रती प्रेम व्यक्त केलंय. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी आनंद शिंदे यांना कमेंट्सद्वारे वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.