Join us

'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:00 IST

Aai kuthe kay karte: अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यापासून देशमुख कुटुंबात अनेक उलाढाली झाल्या आहेत. यात अरुंधती एकीकडे स्वालंबी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देअरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहेत.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत गेल्या काही भागांपासून अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहेत. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यापासून देशमुख कुटुंबात अनेक उलाढाली झाल्या आहेत. यात अरुंधती एकीकडे स्वालंबी होताना दिसत आहे. तर अनिरुद्ध मात्र पूर्णपणे संजनाच्या अधीन झाला आहे. त्यामुळे संजना जे बोलेले ती प्रत्येक गोष्ट अनिरुद्ध ऐकताना दिसतो. यामध्येच अरुंधतीने घर गहाण टाकल्याचं लक्षात आल्यानंतर अनिरुद्ध आणि संजना तिच्यावर आगपाखड करतात. परंतु, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, असं अरुंधती ठणकावून सांगते. 

स्टार प्रवाहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. याचवेळी अरुंधती अनिरुद्धला ठणकावून सांगते.

"उद्या अविनाश पैसे घेऊन पळून गेला तर?", असा प्रश्न संजना आप्पा आणि आईंना विचारते. संजनाचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अरुंधतीला तिला मध्ये थांबवत, "हे घर अजूनही हे घर हातातून गेलेलं नाही", असं संजनाला सांगते. त्याचवेळी अनिरुद्ध येतो आणि संजनाची बाजू घेत अरुंधतीच्या अंगावर ओरडतो. ज्यामुळे संतापलेल्या अरुंधतीने, "अनिरुद्ध माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. मी तुमची लग्नाची बायको राहिलेली नाही", असं बजावते.

दरम्यान, या दोघांच्या वादात आता पुढे काय होणार? अनिरुद्ध- संजना दोघंही अरुंधतीला उत्तर देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार