मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या असंख्य चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली आहे. प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रिल सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रथमेशवर कुटुंबाची जबाबदारी आली. प्रथमेशने घराची जबाबदारी सांभाळलीच. याशिवाय या दुःखावर मात करत त्याच्या आईलाही धीर दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई सोशल मीडियावर रिल करत होते. त्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत होते. इतकंच नव्हे मराठी कलाकारांनीही या माय-लेकाच्या व्हिडीओला चांगलीच पसंती दिली. प्रथमेशच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कळालं नाहीये.
Web Summary : Marathi reel star Prathamesh Kadam passed away after being ill. He was known for his reels with his mother. Prathamesh took care of his family after his father's death. His reels were loved by many. The exact cause of death is unknown.
Web Summary : मराठी रील स्टार प्रथमेश कदम का बीमारी के बाद निधन हो गया। वह अपनी माँ के साथ रीलों के लिए जाने जाते थे। पिता की मृत्यु के बाद प्रथमेश ने अपने परिवार की देखभाल की। उनकी रीलों को कई लोगों ने पसंद किया। मौत का सही कारण अज्ञात है।