Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काव्यांजली - सखी सावली' मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री! साकारणार प्रीतमची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:13 IST

काव्यांजली - सखी सावली या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्यांची एन्ट्री होणार आहे.

कलर्स मराठीवर काव्यांजली - सखी सावली हि नवी कोरी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे. आता लवकरच मालिकेत एक नवी एन्ट्री होणार आहे. बिग बॉस मराठी सिझन चौथामध्ये झळकलेल्या प्रसाद जवादेची एंट्री होणार आहे. तो यात प्रीतमची भूमिका साकारणार आहे. आता नक्की हा कोण आहे ? याच्या येण्याने मालिकेत काय घडणार ? हे आपल्याला हळूहळू कळेलच.  

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, ''बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही. खरंतर या प्रेमाची परतफेड  करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसा देउ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली - सखी सावली या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली.'' 

''प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांनसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी  प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमा विषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्‍या काळनुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार