Join us

Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:48 IST

Rutuja bagwe: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींनी 'बरसो रे मेघा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

कलाविश्वात फार मोजके असे कलाकार आहेत जे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे ऋतुजा बागवे (rutuja bagwe) आणि अश्विनी कासार (ashwini kasar). उत्तम अभिनयाच्या जोरावर या दोन्ही अभिनेत्रींनी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या या दोघी त्यांची मान्सून ट्रीप एन्जॉय करत असून यातील एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली ऋतुजा बागवे कायम तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री अश्विनी कासार दिसत असून या दोघी धबधब्याखाली मस्त नाचताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींनी 'बरसो रे मेघा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. हा व्हिडीओ शेअर करत अश्विनी कासार ही मुलगी मला कधीही कुठेही REEL करायला लावते, असं कॅप्शन ऋतुजाने या व्हिडीओला दिलं आहे. 

टॅग्स :ऋतुजा बागवेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारऐश्वर्या राय बच्चन