Join us

विशाखा सुभेदार पडली प्रेमात?; 'होले होले... हो जाएगा प्यार' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:11 IST

Visakha Subhedar: या व्हिडीओमध्ये तिने दिलेल्या एक्सप्रेशन्समुळे नेटकरी तिच्यावर घायाळ झाले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा उत्तम अभिनेत्री असून एक सुंदर नृत्यांगनादेखील आहे. विशाखाला डान्सची विशेष आवड आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर कायम तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने दिलेल्या एक्सप्रेशन्समुळे नेटकरी तिच्यावर घायाळ झाले आहेत.

विशाखा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे कोणताही नवा ट्रेंड आला की ती तो फॉलो करते. यावेळी तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने एका गाण्यावर सुंदर एक्सप्रेशन्स देत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

विशाखाने रबने बना दी जोडी या सिनेमातल्या होले होले... हो जाएगा प्यार या गाण्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रचंड सुंदर असे एक्सप्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड