Join us

हेमंत ढोमेच्या सासूबाईंनी केला 'जमाल कुडू'वर जबरदस्त डान्स; उज्वला जोग यांचा ट्रेंडिंग व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:17 IST

Ujwala jog: उज्वला जोग यांनी चक्क नऊवारी साडी नेसून जमाल कुडूवर डान्स केला.

रणबीर कपूरच्या animal या सिनेमाची सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. यातही बॉबी देओलचं एन्ट्री साँग जमाल कुडू हे नाव चांगलंच ट्रेंड होतंय. आतापर्यंत या गाण्यावर सामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही भन्नाट व्हिडीओ शूट करत रिल्स शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्यावर ठेका धरायचा मोह अभिनेत्री उज्वला जोग (ujwala jog) यांनाही आवरला नाही.

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्री उज्वला जोग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नऊवारी साडी नेसली असून त्या जमाल कुडू या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अत्यंत सहजसुंदर पद्धतीने डान्स केला.त्यामुळे नेटकरी त्यांच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

दरम्यान, उज्वला जोग यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात तू तेव्हा तशी, हम बने तुम बने, कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, कन्यादान, झिम्मा, सौभाग्य कांकन यांसारख्या मालिका, सिनेमात त्या झळकल्या आहेत. तर, शांतता कोर्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले यांसारख्या नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनबॉबी देओलरणबीर कपूरसेलिब्रिटीसिनेमा