Join us

मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक, सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 16:28 IST

सुप्रिया पाठारे अनेकदा मुलाखतींमधून आईविषयी भरभरुन बोलल्या आहेत.

मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नाटक, मालिका, विनोदी कार्यक्रमांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचं निधन झालं आहे. सुप्रिया पाठारे यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर केला आहे.

आईविना आयुष्याची कल्पनाही करवत नाही. जेव्हा मायेचं छत्र हरपतं तेव्हा ते दु:ख पचवणं अशक्य होतं. सुप्रिया पाठारे अनेकदा मुलाखतींमधून आईविषयी भरभरुन बोलल्या आहेत. त्यांच्या करिअरमध्ये आईचा मोठा वाटा आहे. त्यांनी आईचा एक फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये 'आई' एवढंच लिहिलं आहे. सुप्रिया पाठारे यांची बहीण अर्चना नेवरेकर यांनीही फोटो शेअर करत मामीला शुभेच्छा दिल्या आहेत. आज ती आईला भेटेल असंही त्यांनी लिहिलं आहे.

सुप्रिया पाठारे आणि त्यांची भावंडं लहान असताना त्यांची आई पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर अंडी, चणे विकण्याचं काम करायची. नंतर सुप्रिया स्वत:ही आईला हातभार लावायच्या. अनेकदा सुप्रिया आईविषयी बोलताना भावूक झालेलं मुलाखतींमध्ये आपण पाहिलं  आहे. नंतर सुप्रिया या अभिनयात आल्या आणि त्यांचं आयुष्य बदललं,.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारमृत्यू