Join us

हॉरर लूकमध्ये असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:40 IST

Snehal shidam: फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या विनोदबुद्धीच्या कौशल्यावर अनेकांना हसवलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम (snehal shidam).  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहल घराघरात पोहोचली. विनोदाचं अचूक टायमिंग साधण्याचं कसब स्नेहलमध्ये आहे त्यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. स्नेहल कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांनी देत असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये स्नेहलचा एक फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून सगळेच जण थक्क झाले आहेत. स्नेहलने हॉरर लूकमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे तिचे हे फोटो हसताय ना हसायलाच पाहिजे या रिअॅलिटी शोच्या मंचावरील आहे. या कार्यक्रमात एक स्कीट सादर करतांना तिने हा लूक केला होता.

स्नेहलचा हा लूक सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. स्नेहल कायम सोशल मीडियावर तिचे असे फोटो वा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारचला हवा येऊ द्यासेलिब्रिटी