Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर शर्मिष्ठा- तेजसने दिली गुडन्यूज; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:30 IST

Sharmishtha raut: शर्मिष्ठाने तेजस देसाईसोबत लग्न केलं असून आता या दोघांच्या संसारात एका नव्या पाहुण्याने एन्ट्री घेतली आहे. या नव्या पाहुण्यासोबत तिने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत ( sharmishtha raut). असंख्य गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली शर्मिष्ठा अलिकडेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकली होती. या शोमुळे चर्चेत आलेली शर्मिष्ठा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असते. अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे.

शर्मिष्ठाने तेजस देसाईसोबत लग्न केलं असून आता या दोघांच्या संसारात एका नव्या पाहुण्याने एन्ट्री घेतली आहे. या नव्या पाहुण्यासोबत तिने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. शर्मिष्ठाने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली असून ही कार तिने पती तेजसला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिली आहे.

"माझे रसिक प्रेक्षक तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम असू दे.. अजून बरच यशाच शिखर गाठायचय..नविन कार घ्यायची ७-८ महिन्यांपासून डोक्यात होत पण बजेट आणि रेग्युलर खर्चाच गणित finally मॅनेज झाल आणि २९ जुलैला तेजसचा वाढदिवस असतो तर त्या निमित्ताने गाडी तेजसला gift केली.. आमच्या ह्या क्षणी कायम आमच्या सोबत असणाऱ्या तुम्हा सर्वांचे आणि @salgarsneha @amolsalgar_official @mi_darshana यांचे खूप खूप आभार..", अशी पोस्ट शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

दरम्यान, शर्मिष्ठाने ११ ऑक्टोबर २०२० रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तेजस देसाईसोबत लग्न केलं. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी तिने अमेय निपाणकरसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. शर्मिष्ठा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'मन उधाण वाऱ्याचे‘, ‘जुळून येती रेशीम गाठी‘, 'कुंपण' ,'सप्तपदी', 'चार दिवस सासूचे', 'अभिलाषा', 'एक झुंज वादळाशी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार