सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. अनेक कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच अनेकदा ते त्यांच्या कॉलेज जीवनातील किंवा शालेय जीवनातील फोटो, किस्से शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतोय. या अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विशेष म्हणजे फोटोत दिसणारी ही चिमुकली आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नायिका, खलनायिका अशा कितीतरी भूमिका तिने गाजवल्या आहेत. विशेष म्हणजे ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच फिटनेसमुळेही चर्चेत येते.
अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे तिचा हा फोटो पाहून अनेकांनी तिला ओळखलं नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माधवी निमकर आहे. माधवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
Web Summary : Marathi actress Madhavi Nemkar's childhood photo went viral. Many didn't recognize her. She's known for acting and fitness, starring in many hit series as both heroine and villain.
Web Summary : मराठी अभिनेत्री माधवी निमकर की बचपन की तस्वीर वायरल हो गई। कई लोग उन्हें पहचान नहीं पाए। वह अभिनय और फिटनेस के लिए जानी जाती हैं, और कई हिट धारावाहिकों में नायिका और खलनायिका दोनों के रूप में अभिनय किया है।