Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची सून आहे सई रानडे; मावस सासू सुद्धा आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:27 IST

Saii ranade: सईचं जवळपास सगळंच कुटुंब कलाविश्वात सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई रानडे (saii ranade). 'देवयानी' या गाजलेल्या मालिकेतून सई नावारुपाला आला. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणाऱ्या सई सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे आजच्या घडीला तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सईचे हे चाहते तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या खासगी जीवनाविषयी देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यामध्येच आता सध्या तिच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे.

कलाविश्वात दांडगा वावर असणाऱ्या सईच्या सासूबाईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सईने ठाण्याच्या सलील साने याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे सलील हा प्रसिद्ध अभिनेत्री मेघना साने यांचा लेक आहे. मेघना साने यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर तिचे सासरे प्रसिद्ध संगीतकार आहेत. मेघना साने यांनी काही काळ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

मेघना साने यांचे गाजलेले सिनेमा, नाटक

सध्या मेघना या नाशिकच्या रेडिओ विश्वास यावर अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेताना दिसतात. तसंच त्यांनी 'तो मी नव्हेच', 'लेकुरे उदंड झाली', 'मिट्टी', 'लढाई' या नाटक आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. 

सईची मावस सासूदेखील अभिनेत्री

सईची मावस सासू म्हणजेच मेघना साने यांची सख्खी बहीणदेखील अभिनेत्री आहे. शर्मिला मेढेकर-कुलकर्णी असं त्यांच्या बहिणीचं नाव असून त्यांनी १९८४ साली आलेल्या ' हेच माझं माहेर' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील 'कळले काही तुला, कळले काही मला' हे गाजलेलं गाणं त्यांच्यावर चित्रीत झालं होतं. शर्मिला कुलकर्णी यांनी मराठी निर्माते सतीश कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

दरम्यान, सई मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'वहिनीसाहेब', 'देवयानी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'बरसातें' या हिंदी मालिकेत काम करत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसिनेमासेलिब्रिटी