Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:50 IST

Reshma shinde: काही दिवसांपूर्वी रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे.

'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर रेश्माने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात नुकताच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही ती कमालीची सुंदर दिसत आहे. इतकंच नाही तर तिने व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोझा सिनेमातील गाणं प्ले केल्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच सुरेख वाटत आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, रेश्माने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, रंग माझा वेगळा या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर आज रेश्माचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती कायम चर्चेत येत असते.

टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रिटी