Join us

'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:08 IST

Reshma shinde: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने वडिलांसोबतच आईलाही फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलिकडेच सर्वत्र मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा झाला. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या वडिलांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी आपल्या वडिलांप्रतीचं प्रेम, आदर व्यक्त केला. तर, काहींनी आपल्या वडिलांसोबतचे खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्येच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने वडिलांसोबतच आईलाही फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). कलाविश्वाप्रमाणेच रेश्मा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक नव्या पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यात तिने फादर्स डे निमित्त एक पोस्ट शेअर केली. यात तिने आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

"हे माझ favourite गाण आहे.. जेव्हा जेव्हा मी हे गाण ऐकल आहे तेव्हा तेव्हा मी खूप emotional झाले आहे..Happy Father's DAY Baba. आणि बाबा ऑन ड्युटी असताना बाबाच्या जागी खंबीरपणे सगळ्या जबाबदाऱ्या उचलणाऱ्या माझ्या आई ला ही...Happy Father's day Aai,"  असं कॅप्शन देत रेश्माने हा फोटो शेअर केला.दरम्यान, रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा ती प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफशी निगडीत गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

टॅग्स :रेश्मा शिंदेसेलिब्रिटीटेलिव्हिजनजागतिक पितृदिन