Join us

नाकात नथ अन् मराठमोळा ठसका; रेश्मा शिंदेच्या फोटोवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:10 IST

Reshma shinde: अलिकडेच तिने मराठमोळा साजशृंगार करुन एक फोटो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. रंग माझा वेगळा या मालिकेच्या माध्यमातून रेश्मा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिने दीपा ही भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच रेश्मादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियाचा वापर करत असते.

रेश्मा इन्स्टाग्रामवर कायम तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात अलिकडेच तिने मराठमोळा साजशृंगार करुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी मराठमोळा ठसका असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.

रेश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून नाकात नथ घातली आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावर असलेलं गोड हास्य अनेकांना घायाळ करत आहे. रेश्मा कलाविश्वासोबतच सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक ट्रेंड ती फॉलो करते. अलिकडेच तिने गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला होता.

टॅग्स :रेश्मा शिंदेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन