Join us

४ महिन्यांनी राधा सागरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; तुम्ही पाहिलं का अभिनेत्रीच्या लेकाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:08 IST

राधाचा लेक आता चार महिन्यांचा झाला असून तिने पहिल्यांदाच त्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर (radha sagar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी राधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. राधा प्रेग्नंट असल्यापासून ते तिचं बाळ होईपर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली. यामध्येच तिच्या बाळाची एक झलक पाहता यावी यासाठी नेटकरी उत्सुक होते. विशेष म्हणजे चाहत्यांची उत्सुकता फार काळ न ताणता तिने तिच्या बाळाची पहिली झलक अखेर शेअर केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राधाने तिच्या लेकाचे वीरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वीर नुकताच चार महिन्यांचा झाला असून राधाने अखेर त्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. विशेष म्हणजे त्याचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर तो आईसारखा दिसतो की बाबांसारखा यावरही नेटकऱ्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान,  राधाने लग्नानंतर १० वर्षांनी आई होण्याचा निर्णय घेतला. राधाने तिला बाळ होण्यापूर्वी काही काळ कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यापूर्वी ती आई कुठे काय करते या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने अंकिता ही भूमिका साकारली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका