Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या-बिस्कीटांची आरास अन् हलव्याच्या दागिन्यांचा थाट; उत्साहात पार पडलं राधा सागरच्या लेकाचं बोरन्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:45 IST

Radha sagar: राधाने तिच्या लेकाचं मोठ्या थाटामाटात बोरन्हाण केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधा सागर( radha sagar) काही महिन्यांपूर्वीच राधाने एका गोड बाळाला जन्म दिला. वीर असं तिच्या लाडक्या लेकाचं नाव असून सध्या राधा तिच्या बाळामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. राधा तिच्या लेकाचे प्रत्येक सण-उत्सव मोठ्या थाटात साजरे करत असून नुकतंच तिने तिच्या बाळाचं बोरन्हाण केलं.

सध्या सोशल मीडियावर राधाच्या बाळाच्या बोरन्हाणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साग्रसंगीत पद्धतीने वीरचं बोरन्हाण पार पडलं. यावेळी राधाने आणि वीरने काळ्या रंगाचे छान कपडे परिधान केले होते. विशेष म्हणजे वीर सुद्धा हा सगळा सोहळा छान एन्जॉय करत होता.

दरम्यान,राधाने लग्नानंतर १० वर्षांने आई होण्याचा निर्णय घेतला. राधाने तिला बाळ होण्यापूर्वी काही काळ कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. राधाचा संपूर्ण प्रेग्नंसी काळ चाहत्यांमध्ये विशेष चर्चेत राहिला. तिचं २ वेळा डोहाळेजेवण सुद्धा करण्यात आलं. राधाने बाळ होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने इंडस्ट्रीतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यापूर्वी ती आई कुठे काय करते या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने अंकिता ही भूमिका साकारली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका