Join us

'श्रीरामांचं पूजन करु नका..'; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:45 IST

Prajakta mali: प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. तसंच या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

संपूर्ण देशामध्ये काल मोठ्या थाटात रामनवमीचा सोहळा पार पडला. अनेक ठिकाणी रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यात कलाकार मंडळीदेखील मागे नाहीत. अनेक कलाकारांनी इन्स्टाग्रामवर रामनवमीनिमित्त खास पोस्टही शेअर केल्या. यामध्येच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माली हिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत येत आहे.

अलिकडेच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच केवळ श्रीरामाचं पूजन करु नका, तर राम बना, असा मोलाचा संदेशही तिने दिला आहे.

"जय श्रीराम. सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.  {केवळ श्रीरामांचं पूजन करू नका, राम बना. त्यासाठी प्रयत्नशील रहा.} काल नागपूर-रामटेक ला “रामायण” नाट्य पाहण्याचा योग आला. (अयोध्या- वाराणसी सारख्या कलाकारांप्रमाणे नटलेला नटसंच बघून- त्यांचं नाट्य बघून श्रीराम जन्मभूमीत असल्याचा अनुभव मिळाला…," असं कॅप्शन देत प्राजक्ताने रामनवमी उत्सवाचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. तसंच या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमा