Join us

तब्बल २५ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचं झी मराठीच्या मालिकेत पुनरागमन, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By देवेंद्र जाधव | Updated: July 4, 2025 09:48 IST

फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस सारखे शो गाजवणारी मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मराठी मालिकेत दिसणार आहे. सर्वांना तिला पाहण्याची उत्सुकता आहे

झी मराठीच्या अनेक नायिकांनी मालिका आणि टेलिव्हिजन क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली. या अभिनेत्रींनी नंतर अनेक चॅनलवर विविध मालिका गाजवल्या. झी मराठीवरील अशीच एक लोकप्रिय नायिका पुन्हा एकदा झी च्या आगामी मालिकेत कमबॅक करणार आहे. ही अभिनेत्री तब्बल २५ वर्षांनी झी मराठीच्या मालिकेतून पुन्हा कमबॅक करणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे नियती राजवाडे. जाणून घ्या

२५ वर्षांनी नियती करणार मालिकेत कमबॅक

झी मराठीवर आगामी 'जगद्धात्री' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेत नियती राजवाडे झळकणा आहे. 'जगद्धात्री' मालिकेत नियती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु यानिमित्त २५ वर्षांनी नियती यांना पुन्हा एकदा झी मराठीच्या मालिकेत पाहायला सर्वजण उत्सुक आहेत. नियती यांनी त्यांच्या खास अभिनयाने मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत एक काळ गाजवला आहे.

नियती राजवाडेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'नो प्रॉब्लेम', 'लबाड कुठली', 'लंडनचा जावई' अशा सिनेमांमध्ये तर 'लेक माझी दुर्गा' या मराठी मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय नियती यांनी 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस' यांसारख्या शोमध्ये उत्कृष्ट अभिनय करत सर्वांना खळखळून हसवलं. आता २५ वर्षांनी नियती यांना झी मराठीच्या 'जगद्धात्री' मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ही मालिका झी मराठीवर कधी सुरु होणार, याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमराठी चित्रपट