Join us
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:47 IST

लग्नानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम केला. लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. तर आता नुकतंच तिचं डोहाळजेवण पार पडलं आहे. सोहळ्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नानंतर अभिनय सोडून नेहा नवऱ्यासोबत कायमची ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. 

हिरव्या रंगाची काठापदराची साडी , सुंदर दागदागिने या लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंदाचा कुर्ता पायजमा घातला आहे. त्याच्या कुर्त्यावर मोराचे सुंदर चित्र रेखाटलं आहे. दोघांचा हा फोटो अतिशय गोड दिसत आहे. दोघेही कौतुकाने बेबी बंपकडे पाहत आहेत आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नेहाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. तसंच 'तू पुन्हा मालिकेत कधी दिसणार?' असा प्रश्नही एका चाहतीने विचारला आहे.  २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. त्यानंतर नवऱ्यासोबत ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली.लग्नानंतर परदेशात गेल्याने नेहा अभिनय क्षेत्रापासून दुरावली आहे. तिथे राहून तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली.'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा 'अजूनही चांदरात आहे' मालिकेत दिसली होती. 'मोकळा श्वास', 'गडबड झाली' या सिनेमांतही तिने काम केलं होतं.आता लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

टॅग्स :नेहा गद्रेमराठी अभिनेतासोशल मीडियाआॅस्ट्रेलिया