Marathi Actress Mira Jagannath Buy New Home: मुंबईसारख्या शहरात आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच घरासाठी प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करत असतो. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपलं नवीन घराचं स्वप्न पूर्ण केलं. अलिकडेच मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी स्वत चं घर खरेदी केलं. तसेच अंशुमन विचारे या कलाकारांनी स्वतःचं घर घेतल्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने नवं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.ही अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. नुकतंच मीराचं गृहस्वप्न साकार झालं आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको',' ठरलं तर मग'तसेच'बिग बॉस मराठी'अशा मालिका आणि रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरांत लोकप्रिय झाली. अशातच काल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी केल्याची गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या नव्या तिचं हे नवीन घर मुंबईत खरेदी केलं आहे.
नवीन घर घेतल्याची आनंदवार्ता चाहत्यांना देत मीराने म्हटलंय, "आज मला एक आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची मी खरोखरच खूप आनंदी आहे, कारण मुंबईत आल्यापासून माझं एकच स्वप्न होतं ते म्हणजे स्वतःचं घर असावं.आज, ते स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. ज्या दिवशी मी मुंबईत आले, त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी मी कठोर परिश्रम केले नाहीत."
पुढे मीराने लिहिलंय,"मी चित्रपट, रिअॅलिटी शोज, मॉडेलिंग आणि मालिकांमध्ये काम केलं; त्यासोबतच साड्यांचा व्यवसाय चालवणं, विविध कार्यक्रमांचं आणि संगीत मैफिलींचं आयोजन करणं अशा अनेक गोष्टीही केल्या. कारण मुंबईत राहणं सोपे नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत."
स्वप्न अखेर सत्यात उतरलं…
"तर, आज माझ्या नवीन घरी पूजा करत असताना, मला 'मॅनिफेस्टेशन'च्या (इच्छित गोष्टी प्रत्यक्षात आणण्याच्या) शक्तीचा अनुभव आला. माझं स्वतःचं घर, ज्याचं मी स्वप्न पाहिलं होतं, ज्यासाठी मी अथक परिश्रम केले होते आणि ज्यासाठी मी जगले होतं, ते स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. ज्या शहराने मला इतके प्रेम दिलं आणि मला माझी स्वतःची ओळख निर्माण करून दिली, त्याच शहरात स्वतःचं घर असणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या अद्भुत प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल, मी तुम्हा प्रत्येकाचा मनापासून आभारी आहे." अशी पोस्ट लिहून मीराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Summary : Mira Jagannath, a popular Marathi actress, realized her dream of owning a home in Mumbai on the auspicious occasion of Akshaya Tritiya. She shared her journey of hard work and gratitude, expressing joy for achieving this milestone in the city that embraced her.
Web Summary : मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ने अक्षय तृतीया के शुभ अवसर पर मुंबई में अपना घर खरीदने का सपना साकार किया। उन्होंने अपनी मेहनत और आभार व्यक्त करते हुए इस शहर में यह मुकाम हासिल करने की खुशी जाहिर की।