Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीरा जोशीच्या घरी वाजणार सनईचौघडे; मेहंदी अन् चुडा सोहळ्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 09:47 IST

Meera joshi: , मीराने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उत्तम अभिनयशैली, नृत्यकौशल्य, दिलखेचक अदा अशा कितीतरी गुणांमुळे प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी (meera joshi).  'तुझं माझं ब्रेकअप'  यामालिकेमध्ये मेनका ही ग्रे शेड भूमिका साकारुन मीराने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मीरा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत येते. मात्र,यावेळी तिच्या लग्नाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

अलिकडेच मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती हिरवा चुडा भरताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिने हातावर काढलेली मेहंदी दाखवली आहे. त्यामुळे मीरा लग्न करतीये की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. परंतु, मीराने याविषयी कोणताही फारसा खुलासा केला नाही. परंतु, हॅशटॅग वापरताना #bridetobe हा हॅशटॅग जरुर वापरला आहे.

दरम्यान, मीराने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मीरा खरोखरच लग्न करतीये का? की एखाद्या प्रोजेक्टचा हा भाग आहे? किंवा मीराच्या घरी अन्य कोणाचं लग्न आहे का? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं मीराने अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहेत. 

टॅग्स :मीरा जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा