Join us

दिल है छोटासा! सेटवर स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या अरुंधतीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:59 IST

Madhurani gokhale: एक वेणी, साडी अशा रुपात वावरणाऱ्या अरुंधतीमध्ये आता बदल झाला आहे. अरुंधतीने तिच्या लूकमध्ये काळानुसार बदल केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांविषयी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. यात अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना या तीनही पात्रांची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात. यात कलाकारही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. यात अलिकडेच अरुंधतीने म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक नवनवीन घटना घडत आहेत. अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिने देशमुखांचं घर कायमचं सोडलं आहे. विशेष म्हणजे एक वेणी, साडी अशा रुपात वावरणाऱ्या अरुंधतीमध्ये आता बदल झाला आहे. अरुंधतीने तिच्या लूकमध्ये काळानुसार बदल केला आहे. विशेष म्हणजे याच बदलेल्या लूकमध्ये तिने सेटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, अरुंधतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती दिल है छोटासा या गाण्यावर मनमुरादपणे बागडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर ती आनंदाने, स्वच्छंदीपणे आता जीवन जगतीये अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे. त्यामुळे सध्या अरुंधतीचा म्हणजेच अभिनेत्री मधुराणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार