Revati Lele Wedding: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतंच मुरांबा फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड तसेच साक्षी महाजन-अथर्व कर्वे या कलाकारांनी लग्न केलं. आता यानंतर आणखी बऱ्याच कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे रेवती लेले. गेल्या अनेक दिवसांपासून रेवती लेले सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यात आता अभिनेत्रीच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
लग्नाची बेडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रेवती लेले लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. अलिकडेच रेवती कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने अमृता नावाची खलनायिकेची भूमिका साकारली होती. नुकतीच ही मालिका संपली असून आता रेवतीची लगीनघाई सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती अखेर ती लग्न करण्यास सज्ज झाली आहे.
दरम्यान,नुकतेच रेवती लेलेने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. डोक्यावर मुंडावळ्या आणि पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री नटलेली पाहायला मिळते आहे.यावरून रेवतीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.
सोशल मीडियावर दिलेली प्रेमाची कबुली...
रेवती लेलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. एका हातात गुलाबाची फुले आणि सूर्यफुलाची फुले तर दुसऱ्या हातातील बोटातील अंगठी दाखवत तिने फोटो शेअर करत आपलं नातं जगजाहिर केलं होतं.
Web Summary : Actress Revati Lele, known for 'Lagnachi Bedi,' is set to marry. Pre-wedding festivities have begun, as seen in recent photos featuring traditional attire. She previously revealed her relationship via social media, delighting fans eager for updates.
Web Summary : अभिनेत्री रेवती लेले, जो 'लग्नाची बेडी' के लिए जानी जाती हैं, जल्द ही शादी के बंधन में बंधने वाली हैं। हाल ही में पारंपरिक परिधान में उनकी तस्वीरें सामने आने के बाद प्री-वेडिंग उत्सव शुरू हो गया है। उन्होंने सोशल मीडिया पर अपने रिश्ते का खुलासा किया था।