Join us

'ज्यांना माझ्या पोस्ट आवडत नाही त्यांनी...'; किशोरी अंबियेची हटके पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:53 IST

Kishori Ambiye: किशोरी अंबिये सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती सेटवरील काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी अंबिये (kishori ambiye). कधी विनोदी भूमिका करुन तर कधी खलनायिकेची भूमिका साकारुन किशोरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकांमुळे आज त्या घराघरात ओळखल्या जातात. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

किशोरी अंबिये सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती सेटवरील काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने मेकअप रुममधील व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने शेअर केलेला फनी व्हिडीओ शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"ज्या लोकांना माझा व्हिडीओ दिसत नाही त्यांनी दुसऱ्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. कदाचित काही तरी दिसेल", असं मजेशीर वाक्य तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, किशोरी कायम तिचे असे फनी व्हिडीओ शेअर करत असते. यात बऱ्याचदा तिच्या व्हिडीओमध्ये तिचे सहकलाकारही सहभागी असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन