Join us

शेतकरी मुलाशी लग्न करणार का? चाहत्याच्या प्रश्नावर जुई गडकरी म्हणते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:40 IST

Jui gadkar: जुईने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी ( jui gadkar). सध्या जुई ठरलं तर मग! या मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून जुई दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिच्या नावाची चर्चा रंगत असते. यात अलिकडेच जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यात एका चाहत्याने तिला थेट शेतकरी मुलाशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत जुईने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

मालिकेत सायलीचा स्वभाव अत्यंत साधा दाखवण्यात आला आहे. तशी तू आहेस का? असा प्रश्न एकाने जुईला विचारला त्यावर, मी अगदीच साधी नाहीये.पण, सरळ नक्कीच आहे. या प्रश्नानंतर जुईला एका चाहत्याने लग्नाविषयी प्रश्न विचारला. “जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा विचार कराल तेव्हा तुमची पसंती एखादा शेतकरी असू शकतो का?”, असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर जुईने होकारार्थी उत्तर दिलं.

'नक्कीच! कारण, आम्ही पण शेतकरीच आहोत', असं म्हणत जुईने लग्नाचा विचार केल्यानंतर एका शेतकरी मुलासोबत लग्न करु शकते असं सांगितलं. तिच्या या उत्तराने तिने चाहत्यांची मन जिंकली आहेत.

दरम्यान, जुई मराठीतील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जुई मुळची कर्जतची आहे. त्यामुळे अलिकडेच तिने कर्जतच्या बाजारातील एक व्हिडीओ शेअर केला होता. जुईने कर्जतच्या शुक्रवारच्या बाजारात फेरफटका मारला आणि भाजीदेखील खरेदी केली.

 

टॅग्स :जुई गडकरीसेलिब्रिटीटेलिव्हिजन