Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझं खूप प्रेम आहे. कारण...'; अश्विनी महांगडेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:09 IST

Ashwini Mahangde: ऐतिहासिक भूमिकांमध्ये झळकलेल्या अश्विनीचा हा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडत असून संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अश्विनी सध्या अनघा ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी ऐतिहासिक भूमिकांमध्ये झळकलेल्या अश्विनीचा हा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडत असून संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अलिकडेच अश्विनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीत सहभागी झाली होती. या वारीत एक आठवण तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यात तिने वारीत सहभागी झाल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. यामध्येच आता तिने वारीशी संबंधित आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्यक्ती म्हणून  वा एक कलाकार म्हणून ती कशी आहे हे सांगितलं आहे.

"मी माणूस म्हणून कितीही वाईट असेन पण माझ्यातल्या कलाकारावर माझं खूप प्रेम आहे. कारण त्या कलाकाराच काम हे लोकांना आनंद देणं आहे", असं कॅप्शन देत अश्विनीने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, अश्विनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार