Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधीच कोणाच्या प्रेमात पडू नका; अक्षयाने दिला मैत्रिणीला सल्ला, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 17:31 IST

Akshaya deodhar: अक्षया आणि तिच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका झी मराठीवर विशेष गाजली. आज सुद्धा ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार वरचेवर चर्चेत येत असतात. या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या जोडीने अंजलीबाई आणि राणादा या मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे या मालिकेच्या सेटवर ही जोडी प्रेमात पडली आणि त्यांनी लग्नगाठ सुद्धा बांधली.मात्र, आता लग्नानंतर कोणीही प्रेमात पडू नका असा सल्ला अक्षयाने चाहत्यांना दिला आहे. त्यामुळे तिचा एक नवा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहे.

अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल आयुष्यातील काही गोष्टी सुद्धा ती चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने तिच्या मैत्रिणींसोबत एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत सिक्कीम टूरला गेली होती. येथील अनेक मजेशीर व्हिडीओ, फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असेलल्या व्हिडीओमध्ये अक्षया आणि तिच्या मैत्रिणींनी  दुल्हन हम ले जाएंगे या सिनेमातील के सरा सरा या गाण्यावर जबरदस्त रील केलं आहे. यात अक्षया आणि तिची एक मैत्रीण तिच्या अन्य दोन मैत्रिणींना लग्न करु नका असा सल्ला देत आहेत. या चौघींचं हे रील मजेचा एक भाग आहे. मात्र, तिचा हा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन