Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या नारकर यांचं शीर्षासन! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्रीचा योगा पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 11:13 IST

अभिनयाबरोबरच ऐश्वर्या यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे.

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक दशकं त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. कधी सोशिक सून तर कधी सशक्त स्त्री तर कधी खलनायिका अशा विविधांगी भूमिका साकारून त्यांनी अभिनयाच्या छटा दाखवल्या. सगळ्याच भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी त्यांना पसंत केलं. 

ऐश्वर्या या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा त्या फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतात. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. त्यांचंय सौंदर्य आजही कित्येकांना भुरळ घालतं. तर पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. या वयातही त्या नियमित योगा आणि व्यायाम करतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओत ऐश्वर्या नारकर हेडस्टँड करताना दिसत आहेत. या व्हिडिओत त्यांचे अॅब्सही दिसत आहेत. यावरुनच त्या फिटनेससाठी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे.  त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. "सुपर वुमन", "तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात", "शीर्षासन" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, ऐश्वर्या यांनी सून लाडकी सासरची, घे भरारी, बंध प्रेमाचे, तांब्याचा विष्णूबाळा, मी तुळस तुझ्या अंगणी अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. लेक माझी लाडकी, या सुखांनो या, स्वामिनी या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यांनी मायके से बंधी डोर, छल शह और मौत, घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकारयोगासने प्रकार व फायदे