Join us

 लग्न पार पडलं 10 फेब्रुवारीला... पण आज... म्हणत यशोमान आपटेने शेअर केले लग्नाचे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:45 IST

Yashoman Apte : फुलपाखरू फेम अभिनेता यशोमान आपटेने शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीची सध्या चर्चा आहे. ‘लग्न पार पडलं 10 फेबु्रवारीला... पण आज...’, असं लिहित त्याने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आणि चाहते जरा कन्फ्युज झालेत...

फुलपाखरू फेम अभिनेता यशोमान आपटे (Yashoman Apte) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. सध्या त्याने शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीची चर्चा आहे. ‘लग्न पार पडलं 10 फेब्रुवारीला... पण आज...’, असं लिहित त्याने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आणि चाहते जरा कन्फ्युज झालेत. यशोमानने लग्न उरकलं की काय? असा प्रश्न काही चाहत्यांना पडला. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर जरा थांबा... हो! कारण यशोमान स्वत:च्या नाही तर त्याच्या भावाच्या लग्नाबद्दल बोलतोय.

यशोमानचा भाऊ अभिमान गेल्या 10 फेब्रुवारीला  ऋतुजा जोशी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. या लग्नाला काल एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्त यशोमानने भावाच्या लग्नाचे अनेक फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत. 

या लग्नात यशोमान  पु.लं.च्या ‘नारायण’ सारखा प्रचंड धावपळ करताना दिसला.  म्हणूनच त्याने स्वत:ला नारायण म्हणत फोटो पोस्ट केला आहे. शिवाय भावाच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यासाठी इतका वेळ का लागला याचं कारणंही सांगितलं आहे. एकंदर  काय तर या लग्नात यशोमानने काम तर केलं पण धमाल सुद्धा तितकीच केली. ते या सगळ्या फोटोंमधून ते अगदी स्पष्ट दिसतंय.

यशोमानला फुलपाखरू या मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेत्यासोबतच यशोमान आता उद्योजकदेखील बनला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च कॅप्टन कूल नावच कॅफे सुरू केलं आहे. त्याच्या या कॅफेला अनेक कलाकारांनी भेट देखील दिली आहे. 

यशोमान हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याचे अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच स्वत:चे अनेक फोटो शेअर करत अनेक ट्रेडिंग रिल बनवत चाहत्यांच्या संपर्कात असतो. यशोमान आपटेने ‘35 टक्के काठावर पास’ या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने ‘झोपाळा’ या नाटकात काम केले होते.

टॅग्स :यशोमन आपटेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार