Aboli Serial : छोट्या पडद्यावरील अबोली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आगळंवेगळं कथानक, इन्स्पेक्टर अंकुश आणि अॅडव्होकेट अबोलीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली तीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अलिकडेच या मालिकेत या मालिकेत विजयाची पुन्हा एकदा एन्ट्री झाली असून त्यामध्ये रंजक वळण आलं आहे. लवकरच अबोली-अंकुशच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. त्यात कारस्थानी विजया त्यांच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर मालिकेत कॅंडीमॅन किलरचीही एन्ट्री झाली आहे.
अबोली विजयाची भूमिका अभिनेत्री रेशम टिपणीस साकारत आहेत. त्यांच्यानंतर अंकुश-अबोलीच्या आयुष्यात कॅंडीमॅन किलरच्या रुपात वादळ येणार आहे. सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीकडून नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. "अबोली-अंकुशचं दार ठोठावणारा हा कँडीमॅन किलर कोण असेल?", असं कॅप्शन देऊन या कॅंडीमॅन किलरची झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी देखील अचूक अंदाज लावला आहे. अबोलीमध्ये अभिनेता उमेश जगताप ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
दरम्यान, उमेश जगताप यांनी 'तुला पाहते रे' या मालिकेत त्याने झेंडेचं पात्र प्रचंड गाजलं. या मालिकेनंतर उमेश जगताप चित्रपट सृष्टीकडे मोर्चा वळवला. रंगभूमीवरही त्यांचा दांडगा वावर आहे. त्यानंतर आता जवळपास ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ते अबोली मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या मालिकेत ते खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.