Abhijeet Shwetchandra : मागील काही दिवसांमध्ये मराठी कलाविश्वातील बरेच लग्नबंधानात अडकले, कुणी नवीन घर घेतलं तर काहींनी आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का आहे. आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra). 'नवे लक्ष्य', 'शुभविवाह' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रघराघरात पोहोचला. सध्या अभिजीत 'आई तुळजाभवानी. या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अगदी महिनाभरापूर्वी अभिजीतने तो लवकरच बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होता. त्यानंतर आता पत्नीच्या डोहाळजेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिजीत आणि त्याची पत्नी सेजलने सोशल मीडियावर सुंदर व्हिडीओ शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. ‘बेबी श्वेतचंद्र Coming Soon’ असं लिहून या कपलने त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. त्यात आता नुकतंच अभिजीतची पत्नी सेजलचं डोहाळजेवण पार पडलं आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिजीतची पत्नी सेजलने डोहाळजेवणासाठी हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलांचे दागिने परिधान केले आहेत. तर अभिनेता पारंपरिक पेहरावात असल्याचा पाहायला मिळतोय.त्यांच्या या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अभिजीत आणि सेजल यांनी २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता जवळपास २ वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
वर्कफ्रंट
अभिजीत श्वेतचंद्रच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर 'बापमाणूस', 'सुभेदार' या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. सध्या अभिजीत 'कलर्स मराठी' वरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत काम करताना दिसतो आहे.