Join us

"तू आहेस म्हणून मी आहे" शशांकने Video शेअर करत बायकोला दिल्या Anniversary च्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:10 IST

शशांकने स्वत: बायकोसाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

मराठी अभिनेताशशांक केतकर (Shashank Ketkar) 'होणार सून मी या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचला. त्याला शशांक कमी आणि श्री नावानेच जास्त ओळखलं जातं. शशांक आणि त्याची पत्नी प्रियंका आज लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त शशांकने बायकोसाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय.

शशांकने स्वत: बायकोसाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तो म्हणतो,"बायको, Happy Anniversary. तुला खरंच सांगतो तू आहेस म्हणून आज मी जो काही आहे तो आहे. तू माझ्यातल्या चिडक्या, भावूक, भांडणाऱ्या, प्रॅक्टिकल, व्यवहारी, अत्यंत तत्वनिष्ठ, कधीकधी खूप विचित्र वागणाऱ्या़, अचानक मस्ती करणाऱ्या, शांत राहणाऱ्या शशांकला सांभाळून घेतेस. म्हणूनच म्हणतो तू आहेस म्हणून मी आहे. आय लव्ह यू"

शशांक केतकरने दिलेल्या या सुंदर शुभेच्छांवर त्याची बायको प्रियंकाने कमेंट करत लिहिली आहे. 'शशा, रडवलंस यार' असं म्हणत ती भावूक झाली आहे. तसंच इतर कलाकारांनीही कमेंट करत शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत. 

शशांक आणि प्रियंका ४ डिसेंबर २०१७ मध्ये लग्नबंधनात अडकले. शशांकने तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रियंकाशी लग्न केले. प्रियंका त्याची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. दोघांना ऋग्वेद हा मुलगाही आहे. शशांक सध्या 'मुरांबा' मालिकेत अक्षय मुकादम ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच तो आगामी मराठी सिनेमातही दिसणार आहे.

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार