Akash Nalawade Wife Pregnancy: सध्याच्या काळात सोशल मिडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्यामध्ये एक दुवा निर्माण झाला आहे. या माध्यमातून कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. लग्न, साखरपुडा असो किंवा प्रेगन्सीसंदर्भात गोड बातमी असो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ते याद्वारे शेअर करत असतात. मालिकाविश्वातील अशाच एका अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर तो लवकरच बाबा होणार असल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांना दिली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे आकाश नलावडे.
अभिनेता आकाश नलावडे हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत पश्या नावाचं पात्र साकारून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.सध्या हा अभिनेता स्टर प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. आता लवकरच अभिनेता बाबा होणार आहे.
आकाश नलावडेच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी (Ruchika Dhuri) आहे. २०१९ मध्ये त्यांच्या लग्नसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या २ वर्षानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दरम्यान,सोशल मीडियावर या कपलने खास पोस्ट शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन देत ही खुशखबर सांगितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय,"आम्हाला जपून ठेवावे लागलेले सर्वात कठीण गुपित...",असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.##bacchanlove, #babyarriving, #newmember असे हॅशटॅग ही त्यांनी पोस्टला दिले आहेत.
दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातूय या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पूजा बिरारी, शिवानी बावकर, साक्षी गांधी तसेच सोनल पवार अशा अनेक कलाकरांनी आकाश आणि रुचिका यांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.