Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप केलं लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

By कोमल खांबे | Updated: May 4, 2026 12:36 IST

अभिनेता ऋग्वेद फडके याने गर्लफ्रेंड विभा पवार हिच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनेता ऋग्वेद फडके याने गर्लफ्रेंड विभा पवार हिच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोजकी पाहुणीमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने ऋग्वेद आणि विभा यांनी सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

ऋग्वेद आणि विभा यांनी आयुष्यातील या खास क्षणासाठी पारंपरिक लूकला पसंती दिली. ऋग्वेदने धोतर, अंगरखा आणि टिळक टोपी असा पेहराव केला होता. या पेहरावात तो राजबिंडा दिसत होता. तर विभाने नऊवारी साडीत नववधू लूक केला होता. लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. यासाठी ऋग्वेदने सूट घातला होता. तर त्याची पत्नी विभाने पैठणी साडी नेसली होती. 

ऋग्वेद आणि विभा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर एका वर्षाने ते आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ऋग्वेदने पारू, अबोल प्रितीची अजब कहाणी, थोडं तुझं थोडं माझं या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. एक अभिनेता असण्यासोबतच तो दिग्दर्शकही आहे. मुशाफिरी या त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय त्याची स्वत:ची निर्मिती संस्थाही आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Actor Rigveda Fadke Marries Girlfriend in Private Ceremony

Web Summary : Actor Rigveda Fadke secretly married Vibha Pawar in a traditional ceremony with close family. The couple, who were dating for years, got engaged last April. Rigveda is known for his roles in 'Paru' and other series and is also a director.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगमराठी अभिनेता