Join us

मराठी अभिनेत्याने मुंबई नव्हे तर नाशिकमध्ये घेतलं घर, Video शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 18:41 IST

अभिनेता 'बिग बॉस'मध्ये येणार असल्याचीही चर्चा

गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. हास्यजत्रेतील कलाकार असो किंवा मालिकांमधील. रुपाली भोसले, शिवाली परब, रोहित माने, पृथ्वीक प्रतापसह काही कलाकारांनी मुंबईत घरं घेतलं. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने मुंबई नव्हे तर नाशिकमध्ये घर घेतलं आहे. याची झलक त्याने व्हिडिओतून दाखवली आहे. कोण आहे हा अभिनेता? 

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत मुख्य पात्र साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadenere) सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने मालिकेत शशांकची भूमिका साकारली. खऱ्या आयुष्यात चेतनने नाशिकमध्ये नवीन घर घेतलं. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. घर बांधण्याच्या आधीचं चित्र आणि आता बांधून झाल्यानंतरचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.'वडनेरे' अशी पाटी लिहिली आहे. आत गेल्यानंतर मोठा हॉल, दोन मोठ्या प्रशस्त बेडरुम, सुटसुटीत किचन, डायनिंग एरिया असं घराचं स्ट्रक्चर आहे. हॉलला जोडून छान गॅलरी आहे जिथे झोका लावला आहे आणि कुंड्या ठेवल्या आहेत. भिंतीवर वारली पेंटिंग केलं आहे. एकूणच अतिशय सुंदर असं घराचं डिझाईन आहे.

'घर हे माझे आनंदाचे, नाशिकचं नवीन घर' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. चेतनने एप्रिल महिन्यातच ऋतुजा धारपसोबत लग्न केलं.  यानंतर काहीच महिन्यात त्याने घर घेतल्याची बातमी दिली. चेतनला सर्व कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  बिग बॉसच्या घरात यावेळी चेतनही प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतानाशिकसुंदर गृहनियोजन