Join us

'बादल बरसा बिजुली..' अविनाश नारकरांनी फॉलो केला ट्रेंड; तुम्ही पाहिला का भन्नाट video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:56 IST

Avinash narkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अविनाश नारकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अविनाश नारकर (avinash narkar) आणि ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) ही अशी एक जोडी आहे जे कोणताही नवा ट्रेंड आला की तो बिनधास्तपणे फॉलो करतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते नवनवीन व्हिडीओ शेअर करत कायम चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी बादल बरसा बिजुली या गाण्यावरचा ट्रेंड फॉलो केला होता. त्यानंतर आता तो ट्रेंड अविनाश नारकर यांनी फॉलो केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अविनाश नारकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते बादल बरसा बिजुली या गाण्यावर भन्नाट डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ते प्रत्येक डान्स एन्जॉय करतात. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट करत आहेत.

दरम्यान, अद्वैत बावडेकर याच्यासोबत त्यांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. हा डान्स करत असताना अविनाश नारकर यांची एनर्जी लेव्हल पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 
टॅग्स :अविनाश नारकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनऐश्वर्या नारकर