Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू याच्याशी लग्न का करतेस?", अरुण कदम यांच्या पत्नीला 'सुंदर' दिसण्यावरुन कुटुंबानेच केलं ट्रोल, व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:55 IST

"तू सुंदर दिसतेस, तुला चांगला मुलगा मिळेल", अरुण कदम यांच्याशी लग्न, पत्नीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

अफलातून कॉमेडी आणि अभिनयाने खळखळवून हसवणारा अभिनेता म्हणजे अरुण कदम. कित्येक कॉमेडी शोमधून त्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. सध्या ते महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अरुण कदम आणि त्यांची पत्नी वैशाली कदम यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. लव्ह गेम लोचा या शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. 

सुंदर दिसणाऱ्या वैशाली कदम यांना अरुण कदम यांच्याबरोबर लग्न केल्यामुळे हिणवण्यात आलं होतं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "आमच्या दिसण्यावरुन आम्हाला खूप ट्रोल केलं जातं. पूर्वी जेव्हा मी यांच्याशी लग्न करायला होकार दिला होता. तेव्हादेखील आम्हाला ट्रोल केलं गेलं होतं आणि आताही केलं जातं. तू एवढी छान आहेस. मग तू याच्याबरोबर लग्न का करतेस? पू्र्वी आम्ही बैठ्या चाळीत राहायचो. तेव्हा मला खूप जण म्हणाले होते की तू हे लग्न का करतेस? तू छान दिसतेस. तुला अजून छान मुलगा मिळू शकतो". 

"कुटुंबीय आणि बाहेरचे सुद्धा मला याबाबत बोलले. पण, फक्त माझे वडील या मतावर ठाम होते की हा मुलगा तुला सुखी ठेवेल. मी फक्त त्यांचं वाक्य लक्षात ठेवलं होतं. कोणी काही बोललं तरी मी लक्ष द्यायचे नाही. मी म्हणायचे की एखादा सुंदर मुलगा आहे आणि त्याने अर्धवट संसार मोडत मला सोडलं. तर त्याला जबाबदार कोण? किंवा तो देखणा असेल पण कमवतच नसेल, तर... अजूनही आमच्या फोटोंवरुन ट्रोल केलं जातं. आता एक फोटोत आम्ही हार घातला होता. तेव्हा एकाने कमेंट केली होती की आता तुमचं लग्न झालं का? मी म्हणाले ३० वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. आता नाही झालेलं", असंही त्या पुढे म्हणाल्या. 

अरुण कदम अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांना सुकन्या ही मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वीच सुकन्या आई झाली आहे. अरुण कदम त्यांच्या नातवाबरोबरचे व्हिडिओ शेअर करत असतात. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता