Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा छावा! मराठी अभिनेत्याने रेखाटलं छत्रपती संभाजी महाराजांचं असं छायाचित्र की तुम्हीही म्हणाल "क्या बात"

By कोमल खांबे | Updated: February 16, 2025 15:16 IST

एकीकडे छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी अभिनेत्याने शंभूराजेंचं छायाचित्र रेखाटून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सध्या विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. एकीकडे या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी अभिनेत्याने शंभूराजेंचं छायाचित्र रेखाटून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

मराठी अभिनेता अक्षय केळकर याने छत्रपती संभाजी महाराजांचं छायाचित्र रेखाटलं आहे. याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षय संभाजी महाराजांचं छायाचित्र रेखाटताना दिसत आहे. "छत्रपती 🧡🚩🙏🏽" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. छावामधील आया रे आया तुफान हे गाणं त्याने या व्हिडिओला दिलं आहे. 

अक्षय अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम चित्रकारही आहे. त्याने ३५०व्या राज्याभिषेक निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचंही चित्र रेखाटलं होतं. अक्षयने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी ४'चा अक्षय विजेताही होता. अलिकडेच तो अबीर गुलाल मालिकेत दिसला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठी