Join us
Daily Top 2Weekly Top 5

 मम्मी, मला खूप काही बोलावंस वाटतंय पण..., आईच्या निधनानंतर अभिनेत्याची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 10:37 IST

Aditya Durve : ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदारांची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य दुर्वे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच आदित्यच्या आईचं निधन झालं.

‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदारांची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य दुर्वे (Aditya Durve) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच आदित्यच्या आईचं निधन झालं.आईच्या निधनानंतर आदित्यने एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आईसोबतचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे. मम्मी मला खूप काही बोलावंस वाटतंय, पण आता काहीच बोलता येत नाही..., अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मम्मी, मला खूप काही बोलावसं वाटतंय पण आता काहीच बोलता येत नाही, फक्त एवढंच म्हणेल की तू फार लवकर सोडून गेलीस, मी तुला कधी सांगितलं नाही, परंतु तुझा हा अभिनेता मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आई. मला माहित आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस, अशी भावुक पोस्ट आदित्यने शेअर केली आहे.

आदित्य दुर्वे हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. मॉडेलिंगपासून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. मॉडेलिंग सुरू असतानाच त्याला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. लाईफ ओके या वाहिनीवरील ‘कॉमेडी क्लासेस’मध्ये त्याला छोटी भूमिका मिळाली. यानंतर मराठी मालिकेत तो झळकला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये या मराठी मालिकेत त्याची वर्णी लागली.  त्यानंतर तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मंडळ भारी’ या मालिकेत दिसला. सध्या तो कर्लस मराठीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दिसत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार