Join us

आत्माराम भिडेंची खऱ्या आयुष्यातील पत्नीही आहे अभिनेत्री, 'या' मराठी मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:15 IST

तारक मेहता मध्ये आत्माराम भिडेंची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांची पत्नी कोण माहितीये का?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) सगळ्यांनाच माहित आहेत. मालिकेतील त्यांची आत्माराम तुकाराम भिडे (गोकुळधामचा एकमेव सेक्रेटरी' ही भूमिका खूप गाजली. आत्माराम भिडे, पत्नी माधवी भिडे आणि त्यांची मुलगी सोनू असं हे मराठी कुटुंब असतं.  मंदार चांदवडकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहितीये का? स्टार प्रवाहवर नवीनच सुरु झालेल्या मालिकेत त्या महत्वाच्या भूमिकेत आहेत.

अभिनेते मंदार चांदवडकर यांच्या पत्नीचं नाव स्नेहल (Snehal) आहे. त्यांनी काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहवर नुकतीच 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका सुरु झाली आहे. मृणाल दुसानिसने या मालिकेतून कमबॅक केलं आहे. याच मालिकेत स्नेहल चांदवडकर या मंजुषा सावंतची भूमिका साकारत आहेत. तोंडावर गोड पण मनातून कट कारस्थान, पैशांची लालच अससेली ही त्यांची भूमिका आहे. स्नेहल यांनी नुकतंच व्हिडिओ शेअर करत सांगितले, "नमस्कार, मी स्नेहल मंदार...मी तुम्हाला भेटायला येत आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील मंजू या भूमिकेत. आंबट, गोड, तिखट अशी ही माझी भूमिका आहे'.

याआधी स्नेहल यांनी काही हिंदी मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. मंदार चांदवडकर बायकोबरोबर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्यांचे व्हिडिओ खूप पसंत केले जातात. 

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :मंदार चांदवडकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन