Join us

प्राजक्तकुंज! प्राजक्ता माळीने शेअर केले वास्तुशांतीचे फोटो, पंढरपूरहुन आले खास पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 18:56 IST

प्राजक्ता नेहमी तिच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कितीही ग्लॅमरस आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी असली तरी तिची आपल्या मूल्यांशी नाळ कायमच जोडलेली असते. अनेकदा तिच्या मुलाखतींमधून किंवा तिच्या सोशल मीडियावरुन याचा प्रत्यय येतो. दिवसेंदिवस प्राजक्ता यशाचं शिखर गाठत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने कर्जतला स्वत:चे फार्म हाऊस घेतले. त्याला 'प्राजक्तकुंज' असं नाव दिलं. आता प्राजक्ताने 'प्राजक्तकुंज'च्या वास्तुशांतीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

प्राजक्ता नेहमी तिच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. त्यात तिच्या दोन क्युट भाची आहेत त्यांचे व्हिडिओही ती शेअर करत असते. आता नुकतंच तिने 'प्राजक्तकुंज'च्या वास्तुशांतीचे फोटो पोस्ट केलेत. या वास्तुशांतीसाठी तिचे आईचे आईवडील पंढरपूरहून आल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले,'कुंजमध्ये ४ पिढ्या.स्ट्राँग बाँड आणि प्रेमाने भरलेली ही रक्ताची नाती असणं म्हणजे आशीर्वादच आहे. आजी-आजोबा (आईचे आई वडील) वास्तूशांतीसाठी खास पंढरपूरातून आले.'

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.'प्राजक्ता एवढी चांगली भक्ती आणि कुटुंब एकत्र आल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले की तू तुझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहेस आणि एक दिवस तुला भेटण्याची आशा आहे आणि आगामी नवीन वर्षात खूप चांगले यश मिळवू इच्छितो.' अशी कमेंट एकाने केली आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतासुंदर गृहनियोजन