Join us

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री संतापली, म्हणाली-'माझ्याबद्दल घाणेरड्या अफवा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 16:44 IST

बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणाऱ्या मीरा जगन्नाथबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ( Mira Jagannath )आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणारी मीरा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मीरा जगन्नाथबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याविषयी तिनं सोशल मीडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे तसेच आपल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवा असे आवाहनदेखील तिनं मुंबई पोलिसांना केले आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

मीराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ही स्टोरी शेअर केली होती, जी आता तिने डिलीट केली आहे. यात मीराने लिहिले होते, सोशल मीडियावर एखाद्या विषयी घाणेरड्या अफवा पसरवून त्यांच्या विषयी लोकांना चुकीची माहिती देणे आणि पर्यायाने त्यांची मानहानी करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे. जो काही समाजकंटक आता माझ्या विरुद्ध करत आहेत. आपल्याला जर अशा पद्धतीचे काही मेसेज किंवा पोस्ट दिसल्या तर कृपया अकाऊंट रिपोर्ट किंवा ब्लॉक करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस यांच्या कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच गुन्हेगार पकडले जातील'.

मीरा चित्रपटसृष्टीत येण्याआधी योग प्रशिक्षक म्हणून काम करत होती. मीरा ही अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्यांगना आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  सतत स्वत:चे बोल्ड, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मीराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत तिने साकारलेली मोमोची भूमिका चांगलीच गाजली होती. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘बिग बॉस मराठी 3’मुळे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसायबर क्राइमबिग बॉस मराठी