Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर माही विजचे नदीमसोबत प्रेमसंबंध? आता अभिनेत्रीने ट्रोलर्सला फटकारलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:39 IST

माही विज घटस्फोटानंतर सलमान खानचा मित्र नदीमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली. आता अभिनेत्रीने याविषयी मौन सोडलंय

टीव्ही अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि पती जय भानुशाली (Jay Bhanushali) सोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर माहीने तिचा जवळचा मित्र नदीमसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यावरून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. या ट्रोलिंगमुळे संतापलेल्या माहीने आता एक व्हिडिओ शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

व्हिडिओमध्ये माहीने स्पष्ट केले की, नदीम हा केवळ तिचा मित्र नाही तर तो तिची मुलगी तारासाठी एक 'गॉडफादर' आहे. माही म्हणाली, "तारा गेल्या सहा वर्षांपासून नदीमला 'अब्बा' म्हणून हाक मारते. ताराने नदीमला अब्बा म्हणावं हा निर्णय मी आणि जयने मिळून घेतला होता. नदीम आमचा कौटुंबिक मित्र असून जयलाही या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. लोकांनी 'अब्बा' या शब्दाला इतके घाणेरडे स्वरूप दिले आहे, जे अत्यंत चुकीचे आहे.''

माहीने ट्रोलर्सला फटकारताना म्हटले की, "आम्ही एकमेकांचा आदर ठेऊन घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण तुम्हाला हे पचनी पडत नाहीये. तुम्हाला केवळ घाण वाद हवा आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कमेंट कशी करू शकता? तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला 'आय लव्ह यू' म्हणत नाही का? तुमची मला लाज वाटते आणि तुमच्या अशा वागण्याने मी खचणार नाही."

माहीने शेवटी स्पष्ट केले की, ती आणि जय घटस्फोट घेत असले तरी जय आणि नदीम आजही एकमेकांचा सन्मान करतात. जयला या मैत्रीबद्दल सर्व काही माहित असून नदीम तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो नेहमीच राहील. माही विजच्या या सडेतोड उत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर तिचे कौतुक होत असून, तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

माहीने तिचा मित्र नदीमसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने त्याला 'आय लव्ह यू' असे म्हटले होते. यामुळे अनेक युजर्सनी घटस्फोटानंतर माही नदीमसोबत रिेलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. इतकेच नाही तर माहीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्व गोष्टींमुळे माहीने एक सडेतोड व्हिडिओ बनवून सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahhi Vij slams trolls after rumors of relationship post-divorce.

Web Summary : Mahhi Vij faced trolling after sharing a photo with Nadeem amid divorce rumors with Jay Bhanushali. She clarified Nadeem is her daughter's godfather, condemning the negativity and defending her friendships. She asserted her respect with Jay and dismissed baseless accusations.
टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडटिव्ही कलाकार