Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:52 IST

अभिनेता पृथ्वीक प्रतापने अत्यंत साध्या पद्धतीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

Prithvik Pratap Wedding:   सेलिब्रिटींच्या सगळ्याच गोष्टी भव्य असतात. त्यात जर त्यांच्या लग्नाचा सोहळा असेल तर तो थाट विचारायलाच नको. साधेपणाने लग्न करणारे सेलिब्रिटी खूपच कमी आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि त्याची पत्नी प्राजक्ता.  दोघांनीही अगदी साधेपणाने  नुकताच विवाह केला आहे. ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन करता त्यांचा हा साधेपणा चाहत्यांना देखील खूप आवडला. 

पृथ्वीक प्रतापने लग्नाची कोणतीही माहिती न देता थेट बायकोबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना थक्क केले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याने लग्न केलं. पृथ्वीक प्रतापने अगदी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय का घेतला, यामागे खास कारण आहे. पृथ्वीकने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.  लग्नाचा खर्च वाचवून हे जोडपं दोन मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत. 

पृथ्वीक राजश्री मराठीशी बोलताना म्हणाला, "मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे, असं आम्हाला वाटतं". पृथ्वीकच्या या निर्णयाचं त्याचे चाहते भरभरुन कौतुक करत आहेत.  

टॅग्स :पृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्रालग्न