'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांचा आवडता शो. गेले काही दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत ओंकार भोजने तात्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज आहे. काय आहे या प्रोमोत?'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा दिसणार ओंकारसोनी मराठीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात तो हास्यजत्रेतील त्याचं प्रसिद्ध कॅरेक्टर तात्याच्या भूमिकेत एन्ट्री घेतो. एन्ट्री घेतल्यावर ओंकार म्हणतो, ''सोटू एन्ट्री आहे की नाही माझी! मगाचपासून वाट बघतोय कोणीच काही सांगना. येऊ की आल्यासारखा माघारी जाऊ?'' पुढे सोटू तात्याला सांगतो, ''आपली एन्ट्री आता नाही ५ जानेवारीला आहे.'' त्यानंतर तात्या सर्वांना ''आता बघावं लागतंय'', असं आवाहन करतात.
Web Summary : Omkar Bhojane is set to reprise his role as 'Tatya' in the new season of 'Maharashtrachi Hasyajatra'. The show is making a comeback after a break and will air from January 5th, Monday and Tuesday at 9 PM. A new promo featuring Omkar in his popular character has been released.
Web Summary : ओंकार भोजने 'महाराष्ट्रची हास्यजत्रा' के नए सीजन में 'तात्या' के रूप में अपनी भूमिका को फिर से निभाने के लिए तैयार हैं। ब्रेक के बाद शो वापसी कर रहा है और 5 जनवरी से सोमवार और मंगलवार रात 9 बजे प्रसारित होगा। ओंकार की विशेषता वाला एक नया प्रोमो जारी किया गया है।