Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vanita Kharat : वनीच्या लग्नाचा थाटच न्यारा! लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:05 IST

Maharashtrachi Hasya Jatra fame Vanita Kharat : होय, वनिता व सुमीतच्या लग्नाचा एक महिना पूर्ण झाला. याच निमित्ताने वनिताने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 Maharashtrachi Hasya Jatra fame Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात गेल्या २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड सुमित लोंढेसोबत वनिताने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता वनीने लग्नाचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.  निमित्तही खास आहे. लग्नाला महिना पूर्ण झाला आहे. होय, वनिता व सुमीतच्या लग्नाचा एक महिना पूर्ण झाला. याच निमित्ताने वनिताने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केला. सोबत आपल्या नवरोबाला वन मंथ ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वनीच्या लग्नाचा व्हिडीओ एकदम खास आहे. व्हिडीओतील वनीच्या लग्नाचा थाट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

 व्हिडीओमध्ये वनीच्या लग्नातील काही खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.  लग्नातील धामधूम, मंगलाष्टकं, हळद व संगीत, वनीचा आईसोबतचा भावुक क्षण, हास्यजत्रेच्या कलाकारांसोबतची मज्जा मस्ती असं सगळं काही व्हिडीओत आहे. लग्न लागल्यानंतर वनिता व सुमितने एकमेकांना लिप टू लिप किस केलं, तो रोमॅन्टिक क्षणही व्हिडीओत पाहायला मिळतो. वनिता व सुमितच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात तिने साकारलेली माेलकरणीची भूमिका प्रचंड गाजली होती. गेल्याच महिन्यात तिचा ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा रिलीज झाला.  वनिताचा नवरा सुमित लोंढे याच्याबद्दल म्हणाल तर तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे.   

टॅग्स :वनिता खरातमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा