Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो...", हक्काचं घर घेतल्यानंतर शिवाली परबची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:31 IST

गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ शिवालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिवालीने भावुक पोस्ट लिहिली आहे. 

कल्याणची चुलबुली अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या प्रेक्षकांच्या लाडक्या शोमधून शिवाली घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. तिचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. शिवालीने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं आहे. वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश करत शिवालीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

आता शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नव्या घराची झलक दाखवली आहे. गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ शिवालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत शिवालीचं कुटुंब दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिवालीने भावुक पोस्ट लिहिली आहे. 

१० मे २०२४

नमस्कार! पहिले तर सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त Call Msg करून शुभेच्छा दिल्यात. असाच तुम्हा सगळ्यांचा आशिर्वाद राहू दे आणि या आशिर्वादामुळे मी अक्षय्य तृतीयाच्या शुभ दिनी माझ्या आई बाबांसाठी स्वत:चं, हक्काचं एक घर घेतलं...

काल गृह प्रवेशही झाला, आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. म्हणजे स्वत:चं एक “घर”...खरं तर हे घर माझं स्वप्न नाही... माझ्या आई-बाबांचं स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही.

माझं छोटंसं gift माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या आई बाबांसाठी...इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो. हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या building च्या 2bhk apartment पर्यंतचा होता…प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता. सगळ्यांचे खूप आभार माझ्यासोबत तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम असुद्या…

हा व्हिडिओ यासाठी टाकतेय कारण आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा...व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आलं आहे. काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे...

शिवालीच्या या व्हिडिओत नवीन घरात प्रवेश केल्याचा आनंद तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. शिवालीच्या घरावरील खास नेमप्लेटने लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत शिवालीवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार