Join us

‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:43 IST

Chandrayaan 3 : ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला...

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडरने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केलं आहे. बुधवारी(२३ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. इस्त्रोच्या या यशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण आहे.

अनेक सेलिब्रिटींनी चांद्रयान ३ च्या मोहिमेसाठी इस्त्रोला शुभेच्छा दिल्या होत्या. आता चांद्रयान ३ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने पोस्ट शेअर केली आहे. इतर भारतीयांप्रमाणे प्रसादही चांद्रयान ३चं लँडिंगचं प्रक्षेपण बघत होता. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीव्हीवर चांद्रयान ३च्या प्रक्षेपण सुरू असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. “अभिमानाचा क्षण...जय हिंद” असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

“हा अभिमानाचा क्षण”, ‘चांद्रयान ३’बाबत परेश रावल यांचं वक्तव्य, म्हणाले, “देशाला साधूंची भूमी म्हणणारे...”,

प्रसादने दुसऱ्या पोस्टमध्ये त्याच्या मुलाचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत प्रसादच्या लेकाच्या हातात एक वही दिसत आहे. यावर त्याने चांद्रयान ३चं चित्र काढल्याचं दिसत आहे. “चांद्रयान ३ मोहीम यशस्वी...चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारं पहिलं यान हे भारतीय आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं, वैज्ञानिकांच आणि सर्व भारतीयांचं मनःपूर्वक अभिनंदन” असं म्हणत त्याने इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.  तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे. 

टॅग्स :चंद्रयान-3महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारइस्रो