Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:55 IST

नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताने पतीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता संभेराव. अभिनय किंवा कलाविश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नम्रताने या क्षेत्रात नाव कमावलं. कधी काळी मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणारी नम्रता आज महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. नम्रता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती अनेक अपडेट्स चाहत्यांना पोस्टमधून देत असते. 

नुकतंच नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताने पतीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. नम्रताच्या पतीचं नाव योगेश असं आहे. फोटो शेअर करत तिने खास पोस्ट शेअर केली आहे. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश...मग कुठूनसा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार..."ती फुलराणी " मधलं हे स्वगत अनेकदा अनेक जणींनी सादर केलंय मी ही केलं आणि खरोखरीच माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला...माझ्या सुखात तो त्याचं सुख पाहणारा...सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा ...त्याने मला दिलेलं प्रोत्साहन कौतुक प्रेम आधार मला कायम ताज तवानं ठेवते ... love u yogesh कायम हसत रहा खुश रहा तुझ्या सगळ्या ईच्छा स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना," असं म्हणत नम्रताने नवऱ्यावरंच प्रेम व्यक्त केलं आहे. 

नम्रताच्या या पोस्टवर सेलिब्रिटी व चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौघुलेंनी कमेंट करत "दोघांना खूप प्रेम" असं म्हटलं आहे. तर चेतना भट, सुरभी भावे, सुप्रिया पाठारे, ऋतुजा बागवे या अभिनेत्रींनीही कमेंट केल्या आहेत. 

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या नम्रताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. नम्रताने 'अवघाचि संसार', 'वादळवाद', 'चार दिवस सासूचे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदी मालिकेतही नम्रता झळकली होती. 

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार